पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान ३५ लाख ११ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. सदरची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे .
जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत अनेक ठिकाणी रोख रक्कम आढळून आली आहे. त्यानुसार चाफेकर चौक येथे पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका कारमधून पोलिसांनी ३५ लाख ११ हजार २०० रुपये इतकी रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी जप्त केलेली रोख रक्कम चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या व्हिजिलन्स स्कॉडकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची आहे आणि कुठल्या कारणासाठी आणण्यात आली होती? याची माहिती घेऊन कारवाई निवडणूक निर्णय विभागाकडून कारवाई करण्यात येईल.