बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, सर्वांगीण शिक्षणाची पायाभरणी, दर्जदार सस्ते व पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्यांचा विकास, सामाजिक विकास, महिलांसाठी स्वयंमरोजगार, तरुणांसाठी रोजगार आदी गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यासाठीचा जाहीरनामा मुंबई येथून प्रसिद्ध केला. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुरंदर तालुका हा खरंतर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाने जाहीर केला होता. दर ४ ते ५ वर्षांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाची जळ अधिक तीव्र स्वरुपाची असते.
बळीराजा अशरक्षः मेटाकुटीला येतो. यामुळे गुंजवणी धरणाचे २.२ टीमीसी हक्काचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील तरुण हा खूप हुशार असून, शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या भागातील तरूण नोकरी करीत आहेत. मात्र, सगळ्यांना नोकरी मिळतात असे नाही. काही जण व्यावसायाकडे वळतात. त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.