नवी दिल्ली : दसरा, दिवाळी या सणामध्ये सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळाले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या मते, बुधवारी (दि.6) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 460 रुपयांनी कमी होऊन त्याची किंमत 78,106 रुपये झाली.
सोन्याच्या दरासोबतच चांदीचा भावही 2,268 रुपयांनी घसरला असून, तो 91,993 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर पूर्वी चांदीचा भाव 94,261 रुपये होता. 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99,151 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक नोंदवला होता. तर 30 ऑक्टोबरला सोन्याने 79,681 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,800 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 80,500 रुपये आहे.
याशिवाय, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,650 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 80,350 रुपये असल्याचे समोर आले आहे. तर कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 80,350 नोंदवली गेली आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 78,870 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत काही फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 73,000 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 95,200 रुपयांवर गेले आहेत.