पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु काही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांवर भाजपने गंभीर कारवाई केली आहे. भाजपकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
भाजपने बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, पण काही जणांनी उमेदवारीवर ठाम राहत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे 40 जणांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये सावंतवाडीतील विशाल परब, अक्कोलटमधील सुनील बंडगर, अमरावती येथील जगदीश गुप्ता, श्रीगोंदामधील सुवर्णा पाचपुते, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शोभा बनशेट्टी, साकोलीतील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या ‘या’ 40 जणांची केली हकालपट्टी
-जळगाव- मयूर कापसे आणि आश्विन सोनवणे
-धुळे- श्रीकांत करर्ले आणि सोपान पाटील
-बडनेरा-तुषार भारतीय
-अकोट- गजानन महाले
-बडनेरा-तुषार भारतीय
-साकोली-सोमदत्त करंजेकर
-अमरावती-जगदीश गुप्ता
-अचलपूर-प्रमोद गडरेल
-आमगाव-शंकर मडावी
-अमरखेड-भाविक भगत आणि नटवरलाल अंतवल
-ब्रम्हपुरी-वसंत वरजुकर, राजू गायकवाड आणि आतेशाम अली
-चंद्रपूर-ब्रिजभूषण पाझारे
-घणसांवगी-सतीश घाटगे
-नांदेड-वैशाली देशमुख, मिलींद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे आणि संजय घोगरे
-गंगापूर-सुरेश सोनवणे
-जालना- अशोक पांगारकर
-वैजापूर-एकनात जाधव
-मालेगाव-कुणाल सुर्यवंशी
-बागलान- जयश्री गरुड आणि आकाश साळुंखे
-नालासोपारा- हरिष भगत
-भिवंडी- स्नेहा पाटील
-कल्याण-वरुण पाटील
-जोगेश्वरी-धर्मेंद्र ठाकरु
-कल्याण-वरुण पाटील
-अलिबाग-दिलीप विठ्ठल भोईल
-नेवासा-बाळासाहेब मरकुटे
-सावंतवाडी-विशाल परब
-सोलापूर-शोभा बनशेट्टी
-अक्कलकोट- सुनिल बंडकर
-श्रीगोंदा- सुवर्णा पाचपुते
Maharashtra BJP has expelled 40 of its workers/Leaders from the party in 37 different Assembly constituencies for not following party discipline and breaking it. pic.twitter.com/I1nk5lRoL6
— ANI (@ANI) November 6, 2024