कोल्हापूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचारालाही सुरवात झाली आहे. अशातच माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ केला असून कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत त्यांनी घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘या’ केल्या 10 मोठ्या घोषणा…
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार.
-राज्यातील पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती केली जाणार.
-वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
-वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये मिळणार.
-राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या जाणार.
-शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजारावरून 15 हजार रुपये मिळणार. एमएसपीवर 20 टक्के अनुदान दिले जाणार.
-प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
-अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढवून 15 हजार रुपये वेतन करणार.
-सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘सादर केले जाणार.
-25 लाख रोजगार निमिर्ती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार.
-राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.