पुणे : भारत सरकार अर्थात केंद्र सरकारची नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, ICMR राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेत नोकरीची संधी मिळू शकते.
ICMR राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे ही भरती केली जात आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (गैर वैद्यकीय) यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (गैर वैद्यकीय).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : फर्स्ट क्लास पी.जी. जीवन विज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, अप्लाइड बायोलॉजी किंवा पीएच.डी.सह द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी. जीवन विज्ञान, उपयोजित जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, बायोकेमिस्ट्री.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 71,120/-.
– वयोमर्यादा : 35 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 18 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, जेएम स्ट्रीट, परेल, मुंबई – 400012.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nirrh.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.