नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. किनवटमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असलेले गोविंद जेठेवाडा यांनी विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
किनवटमधील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार गोविंद जेठेवाडा यांनी विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंद जेठेवाडा यांना उपाचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविण्यात आलं आहे. गोविंद जेठेवाडा यांनी हे टोकाच पाऊल का उचललं असावं? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.