नवी दिल्ली : आपण गुंतवणूक केली तर त्यातून चांगला परतावा मिळावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना परतावा मिळत होता. आता शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारही गुंतवणुकीसाठी अन्य पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत Bank FD हा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
सध्या अनेक बँकांकडून ठेवीवर चांगला परतावा अर्थात व्याज दिलं जातं आहे, तुमच्या FD चा कालावधी जितका कमी असेल तितके तुम्हाला कमी व्याज मिळेल. दुसरीकडे, तुम्ही FD मध्ये जितका जास्त कालावधी गुंतवाल तितके जास्त व्याज तुम्हाला मिळेल. खाजगी क्षेत्रातील ICICI बँक 5 वर्षांच्या FD वर 7 टक्के व्याज देते. बँक एका वर्षाच्या कालावधीसह FD वर 6.7% व्याज देते. बँकेने हे दर 17 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 5 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.5% व्याज देते. त्याच वेळी, एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.8% व्याजदर आहे. हे दर 15 मे 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.
एचडीएफसी बँक पाच वर्षांसाठी एफडीवर 7% व्याज देते. परंतु जर तुम्ही एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD करणार असाल तर तुम्हाला 6.6% व्याजदर मिळू शकणार आहे. हे दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदा (BOB) पाच वर्षांच्या FD वर 6.50% वार्षिक व्याज देत आहे. 15 जानेवारी 2024 पासून लागू झालेल्या व्याजदरानुसार, एका वर्षाच्या FD वर वार्षिक 6.85 टक्के व्याज मिळत आहे.