आपल्या शरीरासाठी सर्वच जीवनसत्त्वांची गरज असते. त्यात Vitamin D हे एक आवश्यक पोषकतत्व आहे, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. हे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत सूर्यप्रकाश असला तरी काही खाद्यपदार्थ देखील त्यात भरपूर प्रमाणात असतात.
Vitamin D हे सामान्यतः दुग्धजन्य पदार्थ आणि माशांमध्ये आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची अनेक लक्षणे असतात. त्यात स्नायू कमकुवत किंवा पेटके येणे हे लक्षण असू शकते. याशिवाय, हाडांमध्ये वेदना, थकल्यासारखे वाटणे, अस्वस्थ असणे, पायऱ्या चढण्यात किंवा मजल्यावरून उठण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसू शकतात. तसेच स्तब्ध होऊन चालणे, हाडातील हेअरलाईन फ्रॅक्चर हेदेखील जाणवू शकते.
त्यामुळे आहारात पालक भाजीचा समावेश करावा. ही एक पौष्टिक भाजी आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी असते. त्यात लोह आणि कॅल्शियमसारखे इतर महत्त्वाचे पोषक घटक देखील असतात. पालक कोशिंबीर किंवा पकोड्याच्या स्वरूपात कच्चा खाऊ शकतो. याशिवाय, मशरूम हे व्हिटॅमिन डीचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, विशेषत: जेव्हा ते सूर्यप्रकाशात वाळवले जातात.