बापू मुळीक / सासवड : पुरंदर -हवेली विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांपैकी 26 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. दत्तात्रय मारुती झुरंगे, दिगंबर गणपत दुर्गाडे, दिलीप विठ्ठल गिरमे, शंकर बबन हरपळे, संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे, अभिजीत मधुकर जगताप, संदीप बबन मोडक, आकाश विश्वनाथ जगताप, जालिंदर सोपान कामठे, गणेश बबनराव जगताप या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.
तर उदय कुमार वसंतराव जगताप, सुरेश बाबुराव वीर, महादेव साहेबराव खेंगरे, अतुल महादेव नांगरे, संभाजी सदाशिव झेंडे, विजय सोपानराव शिवतारे, संजय चंद्रकांत जगताप, उत्तम गुलाब कामठे, शेखर भगवान कदम, विशाल अरुण पवार, सुरज संजय भोसले, अनिल नारायण गायकवाड, उमेश नारायण जगताप, संजय शहाजी निगडे, कीर्ती शाम माने, सुरज राजेंद्र घोरपडे हे 16 वैध उमेदवारांची नावे आहेत .
याबाबतची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तर याच 16 उमेदवारांना चिन्ह वाटप हे थोड्या वेळेत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी दिली.