CM Yogi Adityanath Death Threat : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज करत धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी 10 दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्दीकीसारखे मारु असा मेसेजेमध्ये उल्लेख करुन धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कसून शोध सुरू केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचे नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.