पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी सणांनिमित्त रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हडपसर स्थानकावरून हिसारसाठी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच पनवेल-हजूर साहीब नांदेड दरम्यान देखील विशेष रेल्वे धावणार आहे, अशी माहिती रातवा विभागाने दिली आहे.
- हडपसर-हिसार विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२४) ४ नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी २ वाजून १५ मिनिटानी सुटणार आहे, तर दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी हिसारला पोहचेल.
- हिसार-हडपसर विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२३) ३ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हडपसरला पोहचेल. गाडीला पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, चिरवा, लोहारू आणि सरदूलपूर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
- पनवेल-हजूर साहीब नांदेड विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०७६३६) ७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता नांदेडला पोहचेल.
- हजूर साहीब नांदेड-पनवेल विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०७६३५) नांदेड येथून ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला पोहचेल, गाडीला कर्जत, लोणावळा, पुणे, दौड, कुर्दुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.