पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाखारी गावच्या हद्दीतील वाकडापुल येथे रस्ता ओलांडणाऱ्या वारकरी पादचाऱ्याला एका चारचाकी वाहनाने धडक दिली होती. त्यामध्ये अनोळखी पादचाऱ्याची गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखरी गावच्या हद्दीतील भारत पेट्रोलपंप समोरील वाकडापुल येथे आज दुपारी दोनच्या सुमारास पुणे वरून सोलापूर दिशेने जाणाऱ्या एम. एच. 14 ई. यु. 5337 या कारने रस्ता ओलांडणाऱ्या अंदाजे 70 वर्ष असलेल्या वृद्ध पादचाऱ्याला जोरात धडक दिली होती. रस्ता ओलांडणारा पादचारी व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच सदर पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत कारचालक दादा मनोहर गोसावी (रा. पुणे) याच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उत्तम कांबळे हे करत आहे.
रुग्णवाहिका अडकली यवत येथील बाजार कोंडीत…
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखरी येथील झालेल्या अपघातग्रस्तास लवकर उपचार मिळावे यासाठी केडगाव येथील खाजगी रुग्णवाहिकेतून यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, यवत येथे सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका काही काळ अडकल्याने अपघातग्रस्त व्यक्तीस उपचार मिळण्यास उशीर झाला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.