खेड : ऐन दिवाळीच्या दिवशी कोकणातल्या कुवे घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. खेड-दापोली मार्गावर असलेल्या कुवे घाटात दापोली मिरज एसटी बस 20 फूट खोल कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर गंभीर जखमी झाले असल्याची माहीती मिळत आहे. तर 15 ते 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अधिक माहिती अशी की, खेड-दापोली मार्गावर मिरजला जाणाऱ्या एसटी बसला कुवे घाटात अपघात झाला आहे. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुवे घाटात तब्बल 20 फूट खाली बस कोसळली, या बसमध्ये एकूण 20 प्रवासी प्रवासात करत, यातल्या 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.