पुणे : पुण्यातील महर्षीनगर परिसरात शत्रुज विहार सोसायटी येथे राहणाऱ्या संजय रूपचंद गोंदे (वय ६१) यांचा फ्लॅट हा चोरट्याने फोडला. यामध्ये चार लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाटातील सव्वाचार लाखांचे सोने-चांदी लंपास केल्याचे दिसून आले.