देहूरोड : विधानसभा निवडणुकीदरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निवडणूकप्रक्रिया शांततेत आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या देहूरोड पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व ६६ परवानाधारकांची अग्निशस्त्रे (पिस्तुले) देहूरोड पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
सुरक्षिततेचा विचार करून बँकांची तीन आणि लष्कराची तीन अग्रिशखे वगळता, परवाना असलेल्यांचा त्यात समावेश आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी ती समक्ष जमा करून घेतली आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल लागणार आहेत. प्रचारासह ही प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक काळात पिस्तूल बाळगणे अथवा सार्वजनिक ठिकाणी ते घेऊन जाण्यास कायद्याने मनाई आहे, त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार देह्रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ६९ परवानाधारक पिस्तूलधारक आहेत.
लष्कराच्या तीन परवानाधारकांनी त्यांच्या कोर्टात अग्रिशखे जमा केली असल्याचे प्रमाणपत्र आणि ६३ जणांची पिस्तुले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी जमा करून घेतली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सात दिवसांनंतर संबंधितांना त्यांची शखे परत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.