मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. अशातच मुंबईमधील वातावरण चांगलाच तापल्याचे दिसत आहे. तसेच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, मुंबादेवी येथे प्रचार करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीमधील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेऐन विधासभा निवडणुकीत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना अप्रत्यक्षपणे माल असं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शायना एनसी या आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यांमाशी संवाद साधत अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाल्या अरविंद सावंत यांनी माल म्हणून उल्लेख केला. यामधून त्यांच्या पक्षाची मनस्थिती दिसते. त्यांची विचारधारा दर्सवते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात. अशी टीका शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर केली आहे.
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले?
अमीन पटेल यांच्या प्रचारसभेत बोलताना अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “आम्हाला इम्पोर्टेड माल नको… आमचा ओरिजनल माल आहे..” असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं आहे.
शायना एनसी यांचं प्रत्युत्तर
एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. जे ठाकरे गटाचे नेते करत आहेत. माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहात, असं शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीमधील उमेदवार शायना एनसी म्हणाल्या.