सागर घरत / करमाळा : करमाळा विधासभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांना मलवडी येथे जबर धक्का बसला आहे. येथील पैलवान बंडुनाना कोंडलकर, उपसरपंच साहेबराव दुरगुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
यावेळी माजी सभापती गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, चंद्रहास निमगिरे, माजी पंचायत समितीचे सदस्य विलास पाटील, सरपंच तानाजी झोळ, पैलवान उमेश इंगळे, राजेंद्रकुमार बारकुंड, म्हैसगाव चे लक्ष्मण पाटील, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन प्रविण पाटील, कन्हेरगांवचे धनंजय मोरे, सरपंच किरण फुंदे, सरपंच रवींद्र वळेकर, घोटीचे सरपंच विलास राऊत उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले कि, 2017 पासून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विकासकामे करताना मी कधीही राजकारण केले नाही किंवा कोणाची अडवणूकही केलेली नाही. आरोग्य, रस्ता, वीज व शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहीन, प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, बंडुनाना तुमच्या पाठीशी खंबीरपणे भावासारखा उभा राहुन तुम्हाला ताकद देणार, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, प्रारंभी मलवडी गावातून आमदार संजयमामा शिंदे यांची घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढत वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सभास्थळी आगमन झाले. सभेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .
2019 च्या निवडणुकीत आम्ही पन्हाळकर, सुरवसे ,दुर्गुळे आणि गावातील इतर समाजांना सोबत घेऊन 1 हजार मताचा लीड नारायण आबांना दिला होता. त्यावेळेस अवघी 100 मतं संजयमामांना आमच्या गावातून मिळाली होती. यापूर्वीच आमच्या गावातील अनेकांनी मामांच्या गटात प्रवेश केला होता. आता आम्हीही प्रवेश केलेला आहे. आमच्या गावाशेजारील पाथुर्डी, घोटी, तसेच हजारवाडी, केतुर नं.1, मिरगव्हण, घारगाव, धायखिंडी, निलज येथील असंख्य कार्यकर्ते रोज मामांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी आमदार संजयमामा शिंदे यांचा विजय निश्चित आहे. तो निकाल सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही.
पै. बंडुनाना कोंडलकर, मलवडी