परळी : परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे करुणा शर्मा या चांगल्याच संतापल्या आहेत. करुणा शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये करुणा शर्मा यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.
काय म्हणल्या करुणा शर्मा?
महाराष्ट्रात लोकशाही संपलेली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता.
तसेच पुढे बोलताना म्हणाल्या, तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही, तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. याचा इतिहास साक्षी आहे, अशी खदखद करुणा शर्मा यांनी सोशल मिडीयावर बोलून दाखवली आहे.