उरुळी कांचन : उरुळी कांचन, शिंदवणे व टिळेकरवाडी येथील अवैध हातभट्टींवर उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.३०) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापे टाकले आहे. या कारवाई पोलिसांनी 4500 लिटर कच्चे रसायन व दारू असा ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शायना क्रिश राठोड (वय-१९, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली), राजेश लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) व परलोक रजपूत (रा. गोळीबार मैदान उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अश्वजित विनोद मोहोड, अमोल संजय खांडेकर व पोलीस हवालदार योगेश चंद्रकांत नागरगोजे यांनी सरकारच्या वतीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरात कॅनॉलचे कडेला एक महिला हातभट्टी दारू तयार करीत आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा आरोपी महिला शायना राठोड या त्या ठिकाणी गावठी हातभट्टी गाळण्याची साधने जवळ बाळगुन गावठी हातभट्टी तयार करीत असताना मिळून आली. पोलिसांनी या कारवाईत ३५० लिटर रसायन व ३५ लिटर दारू व सरपण असा १३ हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (ता.३०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, उरुळी कांचन ते डाळींब रोडवरील पांढरस्थळ परिसरात असलेल्या कॅनॉलचे उजव्या पुलाचे बाजुस आडोषाला अवैध दारू तयार केली जात आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा राजेष लोडे हा गावठी दारू बनवीत असताना आढळून आला. मात्र त्याला पोलीस आल्याची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेवुन कॅनॉलचे कडेने झाडाझुडपातुन पळुन गेला. पोलिसांनी या कारवाईत १६०० लिटर कच्चे रसायन, ३८५ लिटर गावठी हातभट्टी असा एकुण ८४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या घटनेत, टिळेकरवाडी येथील भवरापूर व टिळेकरवाडीच्या वेशीच्या ओढयालगत अवैध दारू तयार केली जात आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य व कच्चे रसायन २००० लिटर व १७५ लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी गावठी हातभट्टी तयार करण्याच्या ठिकाणी कारवाई केली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कच्चे रसायन व दारू असा ३ लाख ८ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई..
नायगाव (ता. हवेली) येथील मार्ग वस्ती चौकात विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी सुमारे 2780 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. तर आरोपी संतोष नारायण चैधरी (वय 48 रा. मार्ग वस्ती, नायगाव ता. हवेली जि. पुणे) याला समजपत्र दिले आहे. उरूळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ रस्त्यावरील तांबे वस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी सुमारे 700 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. तर आरोपी सतीश धर्मा बारंगुळे (वय 49 रा. फाऊंडेषन रोड, तांबे वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली जि. पुणे) याला समजपत्र दिले आहे.