Spain Heavy Rain : स्पेनच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे स्पेनमधील अनेक शहरांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. स्पेनमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.
स्पेनमध्ये झालेल्या पावसाच्या पाण्याचा जोर इतका होता की, वेलेंसिया शहरातील एक प्रमुख पूल पूर्णंत: नष्ट झाला आहे. या पावसामुळे अनेक घरे आणि इतर संरचना मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. या भागात तब्बल चार तासात विक्रमी 320 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पूराच्या पाण्याखाली अनेक शहरं गेली आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेलेंसिया भागात मंगळवारी आठ तासांत एक वर्षात होणारा सरासरी पाऊस झाला आहे. यामुळे शहरातील सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. स्पेनमध्ये झालेल्या या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत.
या आपत्तीमुळे आपत्कालीन यंत्रणांना काम करणे कठीण झाले आहे. मात्र, प्रशासन सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करुन तातडीने मदतकार्य सुरु केले आहे.