उरुळी कांचन, (पुणे) : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कट्टर समर्थक व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गणेश मूर्तीकार व्यावसायिक आप्पासाहेब चंद्रकांत डोंबे (वय- 45) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी (ता. 29) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, त्यांच्यावर आज मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.