पाटणा : बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर त्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. आपली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा वाढवून ‘झेड’ दर्जाची करण्यात यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली आहे.
आतापर्यंत आमदार म्हणून एक वेळेस आणि सहा वेळेस खासदारपद भूषवले आहे. या काळात अनेकवेळा माझ्यावर आणि आपल्या कुटुंबावर हल्ले झाले आहेत. अनेकदा नेपाळमधील नक्षलवादी संघटनांसह अनेक जातीवादी गुन्हेगारांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. पण देवाच्या कृपेने आतापर्यंत मी बचावलो आहे. नेपाळमधील नक्षलवादी संघटनेकडून धमकी मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने २०१५ मध्ये आपल्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. पण २०१९ साली आपली सुरक्षा कमी करून फक्त वाय दर्जाची ठेवण्यात आली. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून देशात सातत्याने गुन्हे केले जात असताना एक राजकीय व्यक्ती म्हणून आपण त्याचा निषेध केला.