पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उप लेखापाल / मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 115 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक-टंकलेखक.
– एकूण रिक्त पदे : 115 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹ 1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹ 900/-
– वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील : किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांच्या : १८ पेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क : 12 ऑक्टोबर, 2024
– ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर, 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tribal.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.