पुणे : शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकविरुद्ध जुगाराचा अड्डा चालवण्याबरोबरच बेकायदा भटारखाना चालवून त्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर केल्याचा गुन्हा शनिवारी (दि. २६) दाखल करण्यात आला. खडक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या नाईक याच्या अड्ड्यावर शुक्रवारी छापा टाकून पोलिसांनी ७० जणांना अटक केली. यासंदर्भात पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी मालक नंदकुमार नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ) आणि मॅनेजर येंकेश्वर गायधनी (वय ५४, रा. धानोरी गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.