पुणे : बाणेर परिसरातील चितळे बंधू मिठाईवाले या दुकानातून चोरट्यांनी शनिवारी (दि. २६) रात्री दीड लाख रुपयांची रोकड चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. या दुकानात शनिवारी रात्री कामगारांनी काही रक्कम गल्ल्यात ठेवली होती. साधारणतः मध्यरात्री दोनच्या सुमारास शटर उचकटून चोरटे आत घुसले. त्यांनी दुकानातील सुमारे दीड लाखांची रक्कम पळवून नेली. चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.