नवी दिल्ली : सध्या फक्त भारतातच नाहीतर जगभरात Google चा वापर वाढला आहे. कंपनीने आता एक नवीन रोलआउट जारी केले आहे, ज्यात युजर्सला पाच नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. हे फीचर Google Messages ला सपोर्ट करतील. हे फीचर केवळ सायबर हॅकर्स आणि सायबर ठग्स यांसारख्या डिजिटल धोक्यांपासून तुमचे रक्षण करणार नाही तर ते तुम्हाला Nude Images पासूनही दूर ठेवेल.
गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते आता स्पॅम कंटेंट आणि धोकादायक लिंक्सवर अलर्ट मोडवर आहे. याशिवाय, आता Nude Images अस्पष्ट अर्थात Blur करून दाखवणार आहे. याचा गुन्हेगारी वृत्तीला आळ आपोआपच बसू शकणार आहे. हे फीचर AI सह हे कार्यरत असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया डिव्हाईसवर होईल. याचा अर्थ ते तुमच्या डिव्हाईसची गोपनीयता राखेल.
Google च्या या नवीन अपडेटनंतर, तुम्हाला Nude Images असलेला कोणताही मेसेज मिळाल्यास Google एक ‘स्पीड बंप’ देईल ज्यामुळे ती इमेज आपोआपच ब्लर अर्थात अस्पष्ट होईल. येथे यूजर्सना कंटेंट पाहण्याचा पर्यायही मिळेल. हे एक पर्यायी फीचर असणार आहे, जे तुम्हाला स्वत:हून सुरु करावे लागणार आहे.