पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला सुरूवात झाली आहे.मात्र या कोर्सला विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.यात माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी यात उडी घेतली आहे,
‘केवळ गणपतीच का, ३३ कोटी देव आहेत. त्यांनाही अभ्यासक्रमात घ्या’, अशी उपरोधिक टीका भुजबळ यांनी येथे केली. आणि ‘कुठे घेऊन चाललो आपण शिक्षण’ असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर भुजबळ माध्यमाशी बोलत होते. “अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्वात नाही. अधिसभा अजून अस्तित्वामध्ये यायची आहे. प्रभारी कुलगुरुंना अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार. आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे?
सगळ्या धर्मात अशा काहीतरी गोष्टी असतील त्याही अशाच शिकवाव्या लागतील. विज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम करा. योगा करा. प्रत्येकाने आपापल्या घरात ते करावे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
प्रा हरी नरके यांनी या कोर्सला विरोध दर्शवला आहे. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे.
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे.
पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्ने ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको,असा सवाल नरके यांनी केला आहे.
मात्र हा कोर्स अनिवार्य नाही ऐच्छिक स्वरुपाचा आहे. ज्यांना हा कोर्स नको आहे त्यांच्यावर प्रवेशासाठी सक्ती नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.