मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ नावे जाहीर केली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची नावे आहेत. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आलं आहे.
तसेच सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात सुरेश भोयार या तगड्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर काही जागांवर शिक्कामोर्तब झाले. आतापर्यंत काँग्रेसने ७१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
काँग्रस उमेदवारांची दुसरी यादी पुढीलप्रमाणे..
- भुसावळ – राजेश मानवतकर
- जळगाव – स्वाती वाकेकर
- अकोट – महेश गांगणे
- वर्धा – शेखर शेंडे
- सावनेर – अनुजा केदार
- नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
- कामठी – सुरेश भोयार
- भंडारा पुजा ठावकर
- अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
- आमगाव – राजकुमार पुरम
- राळेगाव – वसंत पुरके
- यवतमाळ अनिल बाळासाहेब मांगुळकर
- अर्नी – जितेंद्र मोघे
- उमरखेड – साहेबराव कांबळे
- जालना – कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
- वसई – विजय पाटील
- कांदिवली पूर्व – काळु बधेलिया
- चारकोप – यशवंत सिंग
- सायन कोळीवाडा – गणेश यादव
- श्रीरामपूर – हेमंत ओगले
- निलंगा – अभयकुमार साळुंखे
- शिरोळ – गणपतराव पाटील