पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. आता तुमच्याकडे थोडेच दिवस असणार आहेत. लवकर अर्ज करावा.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) येथे वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ आणि मुख्य वित्तीय अधिकारी यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ आणि मुख्य वित्तीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, सी.ए.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2024.