सध्या घराघरात दिवाळीची तयारी सुरु आहे. त्यानुसार, साफसफाई देखील केली जात आहे. पण, या साफसफाईदरम्यान तुम्हाला धुळीपासून त्रास होत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची अडचण दूर होऊ शकते. धुळीची काहींना अॅलर्जी असू शकते. काही सेकंदही धुळीत राहिल्याने शिंका येणे, डोळ्यांना आणि घशात खाज सुटणे आणि नाकात पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते.
घरातील साफसफाई करताना तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर ही एक सामान्य समस्या आहे, जी स्वच्छता करताना बऱ्याच लोकांना त्रास देऊ शकते. साफसफाई करताना योग्य साधने वापरणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा धुळीसाठी, झाडूऐवजी, व्हॅक्यूम क्लिनर वापरा जो फिल्टरने परिपूर्ण असेल. हे फिल्टर धूळ आणि ऍलर्जीन कॅप्चर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त, मॉप आणि ओले कापड वापरल्याने धूळ उडण्यापासून रोखता येते.
स्वच्छतेच्या वेळी धूळ टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचा मास्क वापरणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. N95 किंवा FFP2 सारखे मास्क धुळीचे कण प्रभावीपणे रोखतात. याशिवाय डोळ्यांना धुळीपासून वाचवण्यासाठी गॉगल वापरा. याच्या मदतीने तुम्ही धुळीचे कण टाळू शकता आणि डोळ्यांची जळजळ होणार नाही.