आपल्याला जीवंत राहण्यासाठी लागतो तो म्हणजे ऑक्सिजन. हाच ऑक्सिजन घेतानाची प्रक्रिया म्हणजे श्वास. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा आपण सर्वजण दररोज एक भाग बनतो. पण तुम्ही कधी विचार केला का 24 तासांत माणूस किती वेळा श्वास घेतो? नाही ना…तर एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की संख्या एक-दोन हजार इतकी असेल तर ते चुकीचं ठरू शकतं. कारण, एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाचा वेग त्याच्या वय, आरोग्य आणि शारीरिक प्रकृतीवर अवलंबून असतो. सामान्यतः एक निरोगी प्रौढ व्यक्ती प्रति मिनिट 12 ते 20 वेळा श्वास घेते, असे म्हटले जाते. त्यानुसार, संबंधित व्यक्ती 24 तासांच्या कालावधीत सुमारे 17,000 ते 28,800 श्वास घेते. श्वासोच्छावासाचे गणित हे वाटते तितके सोपे जरी नसले तरी काही अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
जरी ही संख्या सामान्यतः निरोगी व्यक्तीला लागू होत असली तरी, जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तो बदलू शकतो. श्वास घेण्याची प्रक्रिया आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे आणि आपण त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.