विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इंग्लीश मिडीयम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ”ग्रेट पॅरेन्ट डे” सोमवारी (ता.२८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पॅरेन्ट डे सेलीब्रेशनच्या निमित्ताने विद्यालयातील फ्री सेक्शन, नर्सरी, जुनियर व सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांची वेशभूषा परिधान केली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबा यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले. तसेच नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी डान्स व नाटिका सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दरम्यान, विद्यालयाच्या वतीने आजी आजोबांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेग वेगळ्या प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी माध्यामातून सांस्कृतीक कार्यक्रमही घेण्यात आले. आजी आजोबांचा मुलांना त्यांच्या जिवनात उजाळा मिळावा, हा त्या मागचा विद्यालयाचा उद्देश होता. चित्रकलेची शिक्षक मैफूल शेख यांनी कार्यक्रमाच्या सजावटीचे काम पाहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य पोर्णिमा शेवाळे, शिंदे, इनामदार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मावशी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले तर आभार सारीका मकर यांनी मानले.