लोणी काळभोर, (पुणे) : नूतन माध्यमिक विद्यालय वडकी (ता. हवेली) येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील १७ वर्षे वयोगटातील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनीणी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी दिली.
वडकी (ता. हवेली) येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या स्पर्धेत लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुलींनी खो- खो स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला होता.
लोणी काळभोरच्या कन्या प्रशाला विद्यालयाने लोणीकंद येथील सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय विरुद्ध सेमी फायनल सामन्यात दोन गुणांनी विजय मिळवला. त्यामुळे सुभद्राबाई माध्यमिक विद्यालय लोणीकंद विद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पवार पब्लिक स्कूल हडपसर विरुद्ध कन्या प्रशाला सामना झाला. यामध्ये कन्या प्रशालेला द्वितीय क्रमांक मिळाला.
दरम्यान, हवेली तालुक्यात खो – खो क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून कन्या प्रशाला लोणी काळभोरचे तालुक्यात नावलौकिक केले आहे. या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी केले. सर्व शिक्षक, सेवकवृंद, क्रीडा शिक्षक सूर्यवंशी आणि तंत्रस्नेही शिक्षक गोरे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. या सर्वांच्या सहकाऱ्यांमुळे संघ विजयी होऊ
शकला. विजयी संघावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.