पुणे: पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारी यादी जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) गटांकडून हडपसर आणि वडगावशेरीची जागा जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अजूनही महाविकास आघाडीकडून खडकवासला, कोथरूड, पर्वतीचा सस्पेंस कायम आहे. कोथरूडची जागाही ही उबाठाला मिळण्याची शक्यता जास्त आहे. कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट या तीन जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील आठ मतदारसंघापैकी कसबा मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली असून तिथे आमदार धंगेकरांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांचा कमी मताने पराभव झाला होता. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकी काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे असण्याची शक्यता आहे. उबाठाकडून पुण्यात हडपसर आणि कोथरूडची मागणी करण्यात आली. मात्र केवळ कोथरूडच आता उबाठाला मिळण्याची शक्यता आहे. हडपसरच्या जागेवर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे