पुणे : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून होती. महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा वाढत गेला होता त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास उशीर झाला. अजूनही काही जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पोट निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या 48 उमेदवाराची यादी पुढील प्रमाणे..