नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यात येत आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Samsung आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन साधासुधा नाहीतर तीनवेळा फोल्ड होणारा असा असणार आहे. याबाबतची माहिती एका टेक पोर्टलवरून देण्यात आली आहे. त्यानुसार, आता कंपनीकडून तयारी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
Samsung ट्राय फोल्ड फोन आता आणला जात आहे. यापूर्वी Huawei या कंपनीने महिन्याभरापूर्वी जगातील पहिला ट्राय-फोल्ड लाँच केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग आता मार्केटमध्ये पूर्ण ताकदीने उतरत आहे. सॅमसंगने ट्राय फोल्डवर काम सुरू केले आहे, ज्यामध्ये स्क्रीन दोनदा फोल्ड केली जाऊ शकते आणि ती Huawei Mate XT सारखी असेल.
सॅमसंग कंपनीकडून पुढील वर्षी ट्राय फोल्ड फोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ट्राय फोल्ड स्क्रीनच्या निर्मितीचे काम सॅमसंगच्या डिस्प्ले विंगने केले आहे. मात्र, अद्याप लाँचिंगबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली गेली नाही. तरी हा फोन लवकरच आणला जाईल, अशी युजर्सना आशा आहे.