पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एकूण 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात परीक्षा होणार आहेत.
बोर्डाच्या परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, परंतु काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा ‘सीबीएसई’ च्या पेपरवेळी आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे बोर्डातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.
परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
इयत्ता बारावीची परीक्षा
– प्रात्यक्षिक परीक्षा- 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत
– लेखी परीक्षा-11 फेब्रवारी ते 18 मार्चपर्यंत
इयत्ता दहावीची परीक्षा
– प्रात्यक्षिक परीक्षा- 3 फेब्रवारी ते 20 फेब्रवारीपर्यंत
-लेखी परीक्षा- 21 फेब्रवारी ते 17 मार्चपर्यंत