माळेगाव: माळेगाव कारखान्याच्या वतीने कामगारांना दोन टप्यांत २५ टक्के बोनस जाहीर केल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष अॅड. केशव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपाध्यक्ष तानाजी देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील व इतर संचालक उपस्थित होते. या वेळी कायम हंगामी कामगार २५ टक्के, एकत्रित पगार कामगार २५ टक्के, कंत्राटी कामगारांना ८५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.
साखर कामगारांना दिवाळी व मकरसंक्रांतीला हा बोनस दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. सदर बोनसचा निर्णय संचालक मंडळाने जाहीर केल्याने बारामती तालुका साखर कामगार सभा अध्यक्ष विनोद तावरे, उपाध्यक्ष सुरेश देवकाते, कामगार संचालक विलास कोकरे व कामगार बांधवांनी संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.