बापू मुळीक / सासवड : 202 -पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी 202- पुरंदर विधानसभा मतदारसंघ वर्षा लांडगे यांनी दिली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार यांनी 23 ऑक्टोंबर रोजी पुरंदर विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक कक्षाची माहिती व विधानसभा निवडणूक कामकाज विषयक, कार्यपद्धतीबाबत, माहिती घेऊन त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक खर्च कक्ष समन्वयक अधिकारी सुनील परदेशी, आचारसंहिता कक्ष समन्वयक डॉ. अमिता पवार, गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी निरीक्षक संभाजी बर्गे व निवडणूक उमेदवार खर्चाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
आत्तापर्यंत 54 अर्ज विक्री
202 -पुरंदर विधानसभा निवडणुक 22 ऑक्टोबर रोजी 14 उमेदवारांसाठी 29, तर 23 ऑक्टोबर रोजी 12 उमेदवारांसाठी 26 असे एकूण 54 अर्ज विक्री झाले आहेत. गंगाराम सोपान माने, जितेंद्र बाळासाहेब जगताप, संभाजी सदाशिव झेंडे, दिलीप सोपान यादव, योगेश अर्जुन फडतरे, दिलीप विठ्ठल गिरमे, उदयकुमार वसंतराव जगताप, कैलास दत्तात्रय कटके, विशाल अरुण पवार, बळीराम काळूराम सोनवळे, विशाल वसंत जगताप, गणेश बबन जगताप यांनी आज अर्ज घेतल्याची माहिती पुरंदर निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.