पुणे : नुकताच बिगबॉस मराठीचा पाचवा सिझन पार पडला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. त्यात बिग बॉसमध्ये निक्कीचा बाई sss हा शब्द प्रचंड गाजला. बाई sss बाई sss बाई sss म्हणून निक्कीने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं. पण निक्की बाई sss असे सारखं का म्हणते, यावर एका मुलाखतीत तो किस्सा सांगितला आहे.
यावर बोलताना निक्की म्हणाली की, माझी पुण्याची एक मैत्रीण आहे, ती सतत कोणत्याही विषयावर बोलताना बाई म्हणायची. तिची बाई बोलायची सवय मला लागली. यामुळेच माझे सर्व मित्र-मैत्रीण मला निक्की कमी आणि बाई बाई म्हणून जास्त बोलायला लागले आहे. तसेच पुढे बोलताना निक्की म्हणाली, आता सर्वजणच मला काहीही बोलायचे असेल तरीही बाई या नावानेच बोलत आहेत.
दरम्यान, बिग बॉसमध्ये तिची बाई sss हा काय प्रकार, पागल झालाय का? हे वाक्य चांगलंच फेमस झालं आहे. निक्कीचं बाई sss इतकं हिट झालं की अल्पावधीतच ते सोशल मीडियावर ट्रेंड झालं. आता त्या शब्दावर गाणी आणि मिम्स तयार झाले आहेत.