Gangster Chhota Rajan gets bail : गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. जया शेट्टी हत्येप्रकरणी मोका न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
2001 च्या जया शेट्टी खून प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले होते. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र इतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तुरुंगातच राहणार आहे.
विशेष न्यायालयाने मे महिन्यात हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ही शिक्षा स्थगित करण्यात यावी आणि मध्यंतरी त्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
Bombay High Court has given bail to Gangster Chhota Rajan in the 2001 Jaya Shetty murder case. He was convicted and sentenced to life in this case earlier this year. Divisional bench of Justice Revati Mohite Dere and Justice Prithviraj Chavan has given him bail for Rs 1 lakh. pic.twitter.com/pCzVYHY8IJ
— ANI (@ANI) October 23, 2024