भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या 15 सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली आहे. भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात दोन प्रथम श्रेणी सामने खेळवले जातील. प्रथम श्रेणी सामन्यांच्या या मालिकेसाठी भारत-अ संघाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील दोन प्रथम श्रेणी सामने 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना 03 नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. याशिवाय मालिकेतील दुसरा सामना 07 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पहिला सामना मॅके येथे तर दुसरा मेलबर्न येथे होणार आहे. ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर, भारत-अ संघ पर्थ येथे भारतीय वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध 15 नोव्हेंबरपासून तीन दिवसीय सामना खेळणार आहे.
संघात इशान किशन..
टीम इंडियातून अनेक दिवसांपासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचाही भारत अ दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, अभिमन्यू इसवरनला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
INDIA A SQUAD VS AUSTRALIA:
Gaikwad (C), Easwaran (VC), Sudharsan, Nitish Reddy, Padikkal, Bhui, Indrajith, Kishan (WK), Porel (WK), Mukesh Kumar, Khaleel, Dayal, Saini, Suthar and Kotian. pic.twitter.com/pIqGve9HNa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2024
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघ…
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन,देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन (विकेटकीपर), मुकेश कुमार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), खलील अहमद, यश दयाल , नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन
22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात :
भारत अ संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर काही दिवसांनी ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे 03 ते 07 जानेवारी (2025) दरम्यान खेळवला जाणार आहे.