मुंबई : भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये 32 जणांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 24 ॲाक्टोबरला इस्लामपूरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून डॉ.जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून, अनिल देशमुख काटोलमधून, घनसावंगीमधून राजेश टोपे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार या नावाचा उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे नुकताच पक्ष प्रवेश केलेल्या आमदार दीपक चव्हाण फलटणमधून संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य यादी
१) जयंत पाटील- इस्लामपूर
२) रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ
३) मानसिंग नाईक- शिराळा
४) बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
५) शशिकांत शिंदे- कोरेगाव
६) दीपक चव्हाण- फलटण
७) शिरुर- अशोक पवार
८) इंदापूर- हर्षवर्धन पाटील
९) वडगाव शेरी- बापू पठारे
१०) माळशिरस- उत्तमराव जानकर
११) कर्जत जामखेड- रोहित पवार
१२) काटोल- अनिल देशमुख
१३) विक्रमगड- सुनील भुसारा
१४) घनसावंगी – राजेश टोपे
१५) मुंब्रा – जितेंद्र आव्हाड
१६) जिंतूर- विजय भांबळे
१७) अहेरी- भाग्यश्री अत्राम
१८) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
१९) उदगीर- सुधाकर भालेराव
२०) घाटकोपर पूर्व – राखी जाधव
२१) चिपळूण- प्रशांत यादव
२२) राहुरी -प्राजक्त तनपुरे
२३) मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
२४) अकोले- अमित भांगरे
२५) पारनेर- राणी लंके
२६) बीड- संदीप क्षीरसागर
२७) केज- पृथ्वीराज साठे
२८) आंबेगाव- देवदत्त निकम
२९) जुन्नर- सत्यशील शेरकर
३०) इचलकरंजी- मदन कारंडे
३१) भूम परंडा- राहुल मोटे
३२) दौंड- रमेश थोरात
३३) कागल – समरतिजसिंह घाटगे
३४) गंगापूर – सतीश चव्हाण
३५) चंदगड – नंदिनी बाभूळकर