सध्या स्पर्धेच्या युगात आपल्या आरोग्यासाठी म्हणावं तसं लक्ष द्यायला जमतं नाही. परिणामी, अनेक आजार बळावू शकतात. त्यात बैठ काम असो वा बैठी जीवनशैली यामुळे आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळत असतं. त्यात जर तुमचं बसून अर्थात डेस्क जॉब असेल तर तुमच्यासाठी व्यायाम अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
व्यायामामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि बराच वेळ बसल्यामुळे होणाऱ्या काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. त्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दिवसातून फक्त 22 मिनिटे व्यायाम केल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. जे लोक दिवसातून 12 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात, त्यांना मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे त्यांनी व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच जे लोक दररोज 12 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात, त्यांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो. त्यामध्ये दररोज 22 मिनिटांपेक्षा कमी शारीरिक हालचाली झाल्याचे सिद्ध झाले. अशांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे.