पुणे : कार्यालयात काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर मागील तीन वर्षापासून बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीएला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अनिरुद्ध सतीश शेठ (वय-४२, रा. कांचनगंगा होम्स, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे सीएचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सदरचा प्रकार हा २०१९ ते २२ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध शेठ हा सी ए असून त्याचे कोथरूड परिसरात कार्यालय आहे. फिर्यादी महिला हि त्याच्या कार्यालयात नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती.
मार्च २०१९ मध्ये आरोपी अनिरुद्ध शेठयाने फिर्यादी महिलेला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले होते. भुगाव येथील वसाहतीत गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी सोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई, पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.