पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) २८ नोव्हेंबरपासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील १९ मार्गांवर २४ महिला विशेष बस सुरू केल्या जाणार आहेत. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी पीएमपीच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या गाड्या सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी सोडण्यात येणार आहे.
महिलांची गर्दी असलेल्या मार्गावर महिला आणि विविध संघटनाकडून गेल्या काही दिवसांपासून विशेष बस सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार १९ मार्गांवर महिला विशेष बस सुरू केल्या जाणार आहेत. या बसमध्ये वाहकही महिलाच असणार आहे. पीएमपी बसमध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव सीट असल्या, तरी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
या मार्गावर सुरु होत आहेत गाड्या..!
स्वारगेट ते अप्पर डेपो, स्वारगेट ते हडपसर,
स्वारगेट ते येवलेवाडी, अप्पा बळवंत चौक ते सांगवी,
कोथरूड ते विश्रांतवाडी, मनपा भवन ते लोहगाव,
अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,
कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर ते वारजे माळवाडी,
भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते वाघोली,
पुणे स्टेशन ते लोहगाव, मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन,
निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे), निगडी ते भोसरी, निगडी ते हिंजवडी माण, चिंचवडगाव ते भोसरी, चिखली ते डांगे चौक.