दीपक खिलारे
इंदापूर : दिल्ली पोलिसांनी शनिवारी (ता.२६ ) भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची चैकशी केली आहे. कारखान्याच्या कार्यालयात काही काळ चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने काही संचालकांच्या घरीही चौकशी करून त्यांना नोटिस बजावली आहे.
दिल्लीतील एका कंपनीकडून साखर खरेदी-विक्रीच्या प्रकरणात २०१९ मध्ये साखर कारखान्याच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला. त्याच्या सुनावणीसाठी कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित न राहिल्याने दिल्ली पोलिसांचे एक पथक शनिवारी (ता. २६) सकाळी साखर कारखान्यात दाखल झाले.
दरम्यान, कारखान्याच्या कार्यालयात काही काळ चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने काही संचालकांच्या घरीही चौकशी करून त्यांना नोटिस बजावल्याची माहिती आहे. यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे