पिरंगुट : येथील अनंतराव पवार महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक व दैनिक पुणे वैभवचे विभागीय पत्रकार राजेंद्रकुमार शेळके यांना स्व. रामचंद्रजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्ट धोलवड (पुणे) येथील संस्थेच्या वतीने ज्ञान प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे सचिव प्रा. रतिलाल बाबेल यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.
राजेंद्रकुमार शेळके यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले असून त्यांचे सामाजिक, साहित्यिक, व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने सन २०२२-२३ चा राज्यस्तरीय ज्ञान प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शेळके यांनी पुणे आकाशवाणी केंद्र, दूरदर्शनवर काव्य सादरीकरण व प्रगट मुलाखत प्रसारित झाली आहे. त्यांनी अनेक वृत्त पत्रांमधून पत्रकार म्हणून तसेच कथा, काव्य, ललित लेखन, प्रवास वर्णन असे अनेक विषयांवर लेखन प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, त्यांच्या या पुरस्कारा बद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, उप सचिव एल. एम. पवार, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, सह सचिव प्रशासन ए. एम. जाधव आदींनी शेळके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अनंतराव पवार महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय वृंद व विद्यार्थी समूहाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.