मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगास ‘संवैधानिक दर्जा’ देण्यात आला असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास “संवैधानिक दर्जा” मिळण्याकरिता अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीची पूर्तता नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
आयोगाला संवैधानिक दर्जा मिळाल्यामुळे आयोगाचे कार्य प्रभावीपणे आणि सुलभरित्या होण्यास मदत होणार आहे. तसेच समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेसाठी संवैधानिक दर्जा मिळण्याचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. आयोगास वांद्रे येथील प्रशासकीय इमारतीमध्ये जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.